फैजपूरच्या आकाशची अमेरिकेत उंच भरारी

१३,५०० फुटांवरून केलं ’स्काय डायव्हिंग’
जळगाव : येथील आकाश मनोजकुमार पाटील या युवकाने अमेरिकेतील स्याडी यगो येथे सुमारे १३ हजार ५०० फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग करत एक चित्तथरारक कामगिरी केली आहे. हा अत्यंत धाडसी असा प्रकार असून, भारतीय युवकांना ही कामगिरी निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे.

आकाश हा फैजपूर येथील दादासाहेब वसंतराव पाटील औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांचा मुलगा आहे. त्याने अमेरिकेत एम.एस.अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली असून, तेथे उच्च सेवेत आहे. त्याच्या या धाडसी कामगिरीस आई वैशाली पाटील व वडील मनोजकुमार पाटील यांचे सदैव मार्गदर्शन व प्रेरणा मिळत आहे. ही कामगिरी करताना विमानाने १३ हजार ५०० फूट उंचीवर जाऊन विमानातून बलूनच्या सहाय्याने बाहेर पडून अवकाशात झेप घेऊन स्काय डायव्हिंग केले. जीव धोक्यात घालून डायव्हिंग करावे लागते. ही कामगिरी आकाशने यशस्वीपणे पार पाडली आहे. पुन्हा एकदा भारतीय युवकाने आपला ठसा अमेरिकेत उमटवला आहे.

या कामगिरीबद्दल डॉ. गिरीश लोखंडे, डॉ. ए. के. जावळे, अमूल्य डहाणूकर, डॉ. पद्माकर पाटील, लक्ष्मी सॉ मिलचे संचालक अनिल नारखेडे, औद्योगिक वसाहत संचालक मंडळ, उपाध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, योगेश भावसार, नितीन राणे आदींनी अभिनंदन केलं.

You May Also Like