घर, हॉटेल भाड्याने घेऊन पॉर्न शुटिंग ?

मुंबई |  उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत.

 

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तब्बल 8 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या राज कुंद्राच्या भावाने ‘केनरीन’ नावाची कंपनी सुरू केली होती. सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी राज कुंद्राने परदेशातच या कंपनीची नोंदणी केली होती. याद्वारे परदेशात दाखवल्या जाणाऱ्या पॉर्न चित्रपटांचं चित्रीकरण भारतामध्ये व्हायचं आणि वी ट्रान्सफरच्या मदतीने ते परदेशात पाठवलं जायचं.

 

राज कुंंद्रा हॉटेल्स आणि घरं भाड्याने घेऊन तिथे अश्लील चित्रपट शूट करायचा. इंडस्ट्रीमध्ये नवीन येणाऱ्या मॉडेल्सला बॉलीवूडमध्ये संधी देण्याचं आश्वासन देऊन अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी भाग पाडलं जात होतं. तसेच हे चित्रपट पाहण्यासाठी लोकांकडून देखील पैसे घेतले जात होते. या प्रकरणात राज कुंद्राविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर  राजविरूद्ध त्यांच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

You May Also Like

error: Content is protected !!