गृहमंत्रालयाकडून पोलिसांचा गौरव, राज्यातील 11 अधिकार्‍यांचा समावेश

नवी दिल्ली ।  देशभरातील 152 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. यापैकी सर्वाधिक पदके महाराष्ट्राला मिळाले असून राज्यातील 11 अधिकार्‍यांचा गौरव करण्यात आला आहे.  पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले.

 

 

राज्यातील पद्मजा बढे- एसीपी, अल्का जाधव- एपीआय, प्रीती टिपरे- एसीपी, राहुल बहुरे- एपीआय, मनोहर पाटील- पीआय,बाबुराव महामुनी- डीव्हायसपी, अजित टिके- डीव्हायसपी, सुनील कडसने- एसपी, उमेश पाटील- डीव्हायसपी या अधिकार्‍यांना गौरवण्यात आले आहे. यामध्ये 28 महिला पोलीस अधिकारी समाविष्ट आहेत.

 

You May Also Like