भारतीय वाद्यांच्या आवाजाचे बनविणार हॉर्न

नवी दिल्ली ।  केंद्रीय वाहतूक मंत्रालय हॉर्नचा कर्कश आवाज बदलून त्या जागी भारतीय संगीत क्षेत्रातील वाद्यांचा आवाज वापरण्याचे आदेश देणार आहे. मंत्रालयाकडून लवकरच या बाबत अध्यादेश काढण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मधील एका कार्यक्रमात दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत तुमच्या आजूबाजूला भारतीय संगीत क्षेत्रातील वाद्यांचा आवाज ऐकायला मिळाला तर नवल वाटू देऊ नका.

 

 

 

नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयातील सचिवांना एक अध्यादेश काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच भारतीय वाद्यांचे सूर हॉर्नमध्ये ऐकायला मिळणार आहे. भारतीय वाद्य ज्यामध्ये, तबला, पेटी, तानपुरा, बासरीचे सूर हॉर्नमधून ऐकू येणार आहेत. त्यामुळे प्रवास करताना आता तुम्हाला गर्दीत कर्णकर्कश आवाज ऐकू न येता मधूर संगीत येत्या काही दिवसात ऐकायला मिळणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जुनी वाहने भंगारात काढणे का गरजेचे आहे, हे स्पष्ट केले होते. यासह जुन्या वाहनांमुळे काय कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, कोणते धोके आहेत हे गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते.

You May Also Like

error: Content is protected !!