’यास’ चक्रीवादळ: पंतप्रधान मोदींनी घेतला तयारीचा आढावा

नवी दिल्ली : करोनानतंर देशासमोर एक-एक करून संकट येत आहेत. मागील आठवड्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर आता देशाला ’यास’ चक्रीवादळाचा धोका आहे. पूर्वमध्य बंगालच्या खाडीमध्ये शनिवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. यामुळे सोमवार, 24 मे रोजी त्याचे ‘यास’ चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. हे वादळ 26 मे रोजी पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टी ओलांडेल असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यासह 14 विभागांच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली.

पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टी भागात ताशी 155 ते 165 किलोमीटरच्या तुफान वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बंगालमधील गंगेच्या परिसरातील भागात आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडेल. किनार्‍यावर प्रचंड मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने 23 मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात जाऊ नका, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी दिल्लीत राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक झाली. यामध्ये कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी उपस्थित होते. वादळाची शंका असलेल्या राज्यांमध्ये बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन दलाची (एनडीआरएफ) 85 पथके सज्ज असल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम बंगालच्या कोलकाता, हावडा या जिल्ह्यांसह 11 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!