तांदुळवाडी या गावात जीर्ण झालेल्या घराची भिंत कोसळल्याने पती पत्नी गंभीर जखमी

भडगाव तालुक्यातील कजगाव जवळ असलेल्या तांदुळवाडी या गावात जीर्ण झालेल्या घराची भिंत कोसळल्याने पती पत्नी गंभीर जखमी झाले झाल्याची घटना घडली असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोघांचे प्राण वाचले आहे दोघं जखमींवर कजगाव येथील खाजगी रुग्णालयात करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव व पंधरा दिवसापासुन वरून राजाने मारलेली दांडी यामुळे शेतकरी वर्ग व मजुरवर्ग हवालदिल झालेले आहे. अश्या परिस्थिती तांदुळवाडी येथिल दारिद्र्य रेषेखालील जगणारे वयोवृद्ध पती आणि पत्नी हे दिवस भर राबुन पोटाची खळगी भरण्यासाठी मोल मजुरी करत असुन आज सकाळी 5 पहाटेच्या सुमारास अचानक भिंत कोसळली यात अंजनाबाई उत्तम मोरे वय ६१ या भिंतीचे दगड विटा व माती अंगावर पडल्याने जखमी झाल्या तर उत्तम लोभा मोरे वय६५ हे भिंतीच्या ठिघाऱ्याखाली दाबले गेल्याने जखमी झाले अंजनाबाईन मोरे यांनी जखमी अवस्थेत आरडाओरडा केल्याने, गावकरी मदतीसाठी धाऊन आल्याने उत्तम लोभा मोरे यांना तात्काळ भिंतीच्या ढिगाऱ्याखालून गावकऱ्यांनी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला जखमींवर कजगाव येथील डॉ.दिनकर पाटील यांच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले मोरे यांच्या घराचा शासनाने त्वरित पंचनामा करून या कुटूंबास घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी होत आहे.

You May Also Like