पतीने झोपेत केली पत्नीची हत्या

यवतमाळ: येथील शिवाजीनगरमध्ये बहिणीच्या घरी पाहूण पणाला आलेल्या भावाने त्याच्याच पत्नीचा चाकूने भोसकून व नंतर गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली. या सर्व घटनेचा पाच वर्षाचा मुलगा प्रत्यक्षदर्शी आहे. शिवाजीनगर सारख्या उच्चभ्रू वस्तीत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

मेघना रविराज चौधरी (३०) रा. पिंपळगाव ता. पुसद असे मृत महिलेचे नाव आहे. ती पती रविराज रमेश चौधरी (३५) याच्यासह यवतमाळातील शिवाजीनगर स्थित नंणदेच्या घरी आली होती. आरोपी रविराज चौधरी याचा दोन महिन्यापूर्वी अपघात झाला होता. त्यात त्याच्या डोक्याला इजा झाली. त्यासाठी त्याच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्याच्याच अनुषंगाने चौधरी दाम्पत्य बहीण जावई उमेश ठाकरे यांच्याकडे आले होते. बुधवारी मध्यरात्री मेघना पती रविराज व पाच वर्षाचा मुलगा अगस्त्य हे एका खोलीत झोपले होते.

मध्यरात्रीनंतर आरोपी रविराजने पत्नीला झोपेतच चाकूने भोसकले. तिच्या पाठीवर, हातावर व पोटावर चाकूने वार केेले. नंतर तिचा गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. उमेश ठाकरे यांनी घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ घटना स्थळ गाठत आरोपी रविराज रमेश चौधरी (३५) याला अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, ठाणेदार मनोज केदारे यांनी भेट दिली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा…   

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

You May Also Like