मी डिग्रीशिवाय बनलो डॉक्टर; रामदेव बाबांनी उडविली डॉक्टरांची खिल्ली

मुंबई : अ‍ॅलोपथीवरून दोन दिवसांच्या वादावर पडदा टाकणार्‍या रामदेव बाबांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी करोना वॉरियरवर हल्ला केला आहे. अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असे म्हणत त्यांनी देशभरात वाद उभा केला होता. जेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी हे वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले. त्याच्या दुसर्‍याच दिवशी एका मुलाखतीमध्ये त्यांनी डॉक्टरांची खिल्ली उडविली आहे.

संपूर्ण देशातील नागरिकांसाठी डॉक्टर्स देवदूत ठरत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं आहे. यासंदर्भात फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी आपलं विधान जाहीरपणे मागे घ्यायला हवं, असं डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

योग गुरु बाबा रामदेव यांनी एका योग शिबिरातील तरुणासोबत झालेल्या चर्चेचा हवाला देऊन डॉक्टरांची खिल्ली उडविली आहे. तसेच 1000 हून अधिक डॉक्टर करोना लसीचे दोन डोस घेऊनही मृत्यूमुखी पडले आहेत. ते डॉक्टर स्वत:लाच वाचवू शकले नाहीत, असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा आयएमएने आक्षेप घेतला आहे. आयएमएने उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना रामदेव बाबांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

You May Also Like