मी काही नवाझ शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्तिगत भेट झाली नाही. ही काही राजकीय भेट नव्हती. पण माझे त्यांच्यासोबत चांगले संबंध आहे. मी काय नवाझ शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो असा टोला उत्तर देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आल्यानंतर महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन मुद्देसुदपणे माहिती दिली. यावेळी, पंतप्रधानांसोबत तुमची व्यक्तिगत भेट झाली का, अशा प्रश्नांचा भडीमार पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केला.

उद्धव ठाकरे यांनी यावर ठाकरे स्टाईल उत्तर देत म्हणाले की, मी कधी ही गोष्ट लपवली नाही, आज आम्ही एकत्र सत्तेत जरी नसलो तरी आमचे नातेसंबंध हे चांगले आहे. पंतप्रधानांना भेटणे यात काही गैर नाही. मी काही नवाज शरीफ यांना भेटायला नव्हतो गेलोफ, असं रोखठोक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.

You May Also Like