“मराठा आरक्षणावर मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही;” छत्रपती संभाजीराजे

पुणे : सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर समाजात सर्वत्र नाराजी आणि अस्वस्थता आहे निर्माण झाली . या समस्येवर मार्ग निघण्यासाठी मी सकारात्मक आहे. आरक्षणाबाबत मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मार्ग काढण्यात येईल.असे छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यात माध्यमांसमोर बोलताना आपली भूमिका मांडली.

माझी भूमिका ही शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका असेल. त्याच्या राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नसेल. ती समस्त मराठा समाजाची भूमिका असेल, असेही संभाजीराजे यांनी सांगितले. कालच त्यांनी ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही  म्हटले होते.  सध्यस्तिथीत करोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो. आता मोर्चा काढण्यात काही अर्थ नाही. मी मराठा आरक्षणासंदर्भात बराच अभ्यास केला आहे. १०२ वी घटनादुरुस्ती, ऍटर्नी जनरल न्यायालयात काय बोलले किंवा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी का, यावर मी लवकरच बोलेन. मी आता मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि अभ्यासकांना भेटणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.

 

 

You May Also Like