इकरा एज्युकेशन सोसायटी जळगावतर्फे दिवंगत युसुफ खान उर्फ ​​मोहम्मद दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

जळगाव : इकरा एज्युकेशन सोसायटी जळगावतर्फे दिवंगत युसुफ खान उर्फ ​​मोहम्मद दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ शोकसभेचे आयोजन कारी कुद्दुस साहिब (प्रिन्सिपल इकरा बीयूएमएस कॉलेज जळगाव) यांनी पवित्र कुराणच्या पठणाने केले होते. अब्दुल करीम सालार यांच्या अध्यक्षतेखाली ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

युसूफ खानच्या सुवर्ण आठवणींना उजाळा देण्यासाठी जळगावच्या नामवंत व्यक्तींनी मोहम्मद युसूफ खान उर्फ ​​दिलीप कुमार यांना श्रदधांजली अर्पित करून आपले मत व्यक्त केले. इकरा एचजे थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे प्राचार्य डॉ. सय्यद शुजात अली यांनी दिलीप कुमार यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. डॉ. हारून बशीर, डॉ. गयासुद्दीन उस्मानी, डॉ. अमानुल्ला शाह, डॉ.झबीउल्ला शाह, डॉ. ताहिर शेख, डॉ इकबाल शहा, अलहज अमीन भाई बदलीवाला, एजाज अहमद अब्दुल गफ्फार मलिक, सय्यद चांद शेख अमीर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ. वकार शेख यांनी सुत्रसंचालनाचे कार्य उत्तमरित्या पार पाडले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल करीम सालार यांनी दिवंगत मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या सेवा प्रेक्षकांसमोर मांडल्या, ते परोपकारी व प्रामाणिक होते. चित्रपटांमध्ये त्याने मिळवलेला दर्जा. यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण पडद्यामागील माणुसकीसाठी त्यांनी जे केले, खरं तर ते महानायक होते. ते सहानुभूतीशील होते. ते खरे देशभक्त होते. इकराचा पाया व तिचा विकास हा दिवंगत यांच्या प्रेमाचे आणि त्यांच्या श्रमा चे फळ आहे. म्हणूनच इकरा सोसायटीने इकरा डी. एड. महाविद्यालयाचे नाव “यूसुफ खान ऊर्फ दिलीप कुमार डी. एड. कॉलेज” असे ठेवण्याचे आधीच ठरविले आहे, नवीन ईमारतीचा उद्घाटन कार्यक्रम लॉकडाऊन संपल्यानंतर होईल. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने झाली. शोकसभेत इकरा सोसायटीचे सदस्य अब्दुल रऊफ शेख, अब्दुल रशीद शेख, मुहम्मद जफर शेख, अब्दुल अजीज सालार, तारिक अन्वर, अब्दुल नबी बागबान आणि जळगावच्या प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

You May Also Like