गुळण्या करून ओळखा पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; आयसीएमाआरची नव्या पद्धतीला मंजुरी

नवी दिल्ली : करोना संक्रमणादरम्यान चाचणी करण्याची एक नवी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. नव्या ’सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून परवानगीही देण्यात आली आहे. यातही नागरिकांना अवघ्या तीन तासांत या करोनाचा अहवाल मिळणार आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थाच्या शास्त्रज्ञांनी चाचणीच्या या पद्धतीसहीत एका नवा टप्पा गाठला आहे. आयसीएमआरकडून निरीच्या आपल्या संघाला देशतील विविध लॅबमध्ये या नव्या पद्धतीची ट्रेनिंग देण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. सलाईन गार्गल आरटी-पीसीआर या पद्धतीच्या चाचणीत, रुग्णांना खारट पाण्याची गुळणी करून ती एका सामान्य ’कलेक्शन ट्यूब’मध्ये जमा केली जाते. हा नमुना लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो. एका विशिष्ट तापमानात, छएएठख कडून तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो.

त्यानतंर सोल्युशन गरम केल्यानंतर एका आरएनए टेम्प्लेट तयार होतं. त्यानंतर या सोल्युशनवर ’आरटी-पीसीआर’ प्रक्रिया केली जाते. ’नीरी’चे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीच्या या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणं खूप स्वस्त पडतं. लोक स्वतःहून कोरोना संसर्गाची चाचणी करू शकतील कारण ही प्रक्रिया ’सेल्फ सॅम्पलिंग’ला परवानगी देते. यासाठी चाचणीसाठी नमुने देताना नागरिकांना चाचणी केंद्रांवर वाट पाहण्याची किंवा गर्दीत उभं राहण्याची गरज लागणार नाही. यामुळे बराचसा वेळही वाचतो. नव्या पद्धतीत कमीत कमी कचरा निर्माण होतो. तसंच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरेल, असंही डॉ. खैरनार यांनी म्हटलं सांगितलंय.

You May Also Like

error: Content is protected !!