शरद पवारांनी माझी तक्रार काँग्रेस हायकमांडकडे केली असेल तर आनंद आहे, नाना पटोलेंचा टोला

भंडारा । शरद पवार साहेबांनी माझी तक्रार काँग्रेस हायकमांडकडे केली असेल, तर मला आनंद आहे. हे छान झाले. मी, शरद पवार साहेब आणि काँग्रेस हायकमांड, असे आम्ही तिघे बसून महाराष्ट्रासाठी योग्य निर्णय घेऊ, असा मिश्कील टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. ते आज भंडाऱ्यात बोलत होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले यांना हटवण्याचे संकेत दिले जात असून शरद पवारांनी सोनिया गांधींकडे नाराजगी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसमधील ज्येष्ठ नाराज नेत्यांनी प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे नाना पटोले यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. या विषयाला घेऊन नाना पटोले यांनी शरद पवारांना मिश्किल टोल लगावला. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडी सरकारची अद्याप बैठक झालेली नाही. प्रत्येक पक्षाच्या कोटा ठरलेला आहे. ६ व्या सदस्याबाबत अजून बैठक झाली नसल्याने बैठक झाल्यावर भूमिका ठरवू, असे नाना पटोले यांनी सांगितले.
—–शिवसेनेवरही साधला निशाणा
मुंबई महापालिकेत काँग्रेसची अनेक वर्ष सत्ता होती. पण मुंबई कधी तुंबली नाही, असे वक्तव्य नाना पटोले यांनी नागपुरात केले होते. त्यावर शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्याला आता २५ वर्षे उलटून गेली. आता ते सोबतच आहेत. त्यामुळे बघुया त्याचं गुडलक कामाला येतंय का? असे खोचक उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले होते. आता आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रेयेवरून नाना पटोलेंनी वक्तव्य केले आहे. आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या बाजूने मत मांडले. आमच्या काँग्रेसचे गुडलक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात, असा सूचक इशाराही नाना पटोले यांनी दिला.
निधी वाटपात भेदभाव होणे हा गंभीर प्रश्न असून ठरल्याप्रमाणे निधी वाटप होणे गरजेचे आहे. काँग्रेसनेही निधी वाटपात भेदभाव होण्याच्या तक्रारी अनेक वेळी केल्या असल्याचे नाना पटोले बोलले. ह्या गोष्टींमुळे समाजात चुकीचा मेसेज जात असल्याने हे प्रश्न भविष्यात घडू नये म्हणून मुख्यमंत्रानी आपली भूमिका निच्छित करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेना आमदारांना डावलून आपल्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधी देत असल्याच्या गंभीर तक्रारी शिवसेना आमदारांनी केल्याची चर्चा आहे. आता अशा कामांना स्थागिती देण्याची भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतल्याचं बोललं जातंय. त्यावर पटोलेंनी ही प्रतिक्रिया दिली.

You May Also Like