उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा : चंद्रकांत पाटील

मुंबई : “एका अर्थाने मोगलाई आली आहे….हम करे सो कायदा. आम्ही कसलेही कायदे पाळणार नाही असं…शरद पवारांनी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन केलं. आम्ही सहकार्य करत आहोतच ना…आमचा प्रचंड विरोध होता पण एका शब्दाने बोललो का. आता अजित पवारांवर कारवाई करा मग…आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत,” असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

दरम्यान, राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थित असलेल्या कार्यक्रमात करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत तुफान गर्दी झाली होती. यावेळी करोनासंबंधित नियमाचं पालन करण्यात आलं नसल्याने विरोधकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्ह करत राज्यातील जनतेला निर्बंध पाळत सहकार्या करण्याचं आवाहन केल्यानंतर काही वेळातच ही सभा पार पडली. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार पंढरपुरात आहेत.

 

You May Also Like