लसीकरण वेगाने न झाल्यास तिसरी लाट अटळ : पी. चिदंबरम

नवी दिल्ली : करोनावरील लसीकरण वेगाने न झाल्यास तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी दिलांय. लवकरात लवकर लसीकरण करण्यात आले नाही तर त्याचे काय परिणाम होतील, याची जाणीव तज्ज्ञांनी केंद्र सरकारला करून दिली होती.
सरकारला अजूनही संधी आहे ती लसीकरणाच्या कामात मोठा वेग आणण्याची. वेगात लसीकरण झाले नाही तर कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे, या लाटेला कोणीही रोखू शकत नाही.

मात्र असे असूनही लसीकरण मोहिमेला वेग देण्यास सरकारने टाळाटाळ केल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला. लसीचा तुटवड्यामुळे होणार्‍या परिणामाचे विवेचन आता सरकार देऊ शकत नाही, कारण त्यासंदर्भात तज्ज्ञांनी आधीच इशारा दिला होता, असे चिदम्बरम यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.

 

You May Also Like