धुळ्यातून गुटख्याची अवैध वाहतूक; दोघांविरुध्द गुन्हा

धुळे : शहरातील सुरत वळण महामार्गावर गुटख्याची अवैध वाहतूक करणार्‍या मिनीट्रकसह चालक, सहचालकाला ताब्यात घेतले, याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी फिर्याद दिल्यानंतर 24 तासानंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

धुळे शहर पोलिसांनी शहरालगत सुरत वळण महामार्गावर एका मिनीट्रकची पाहणी केली, त्या मिनीट्रकमधूनन (एमपी09/जीएच7986) पानमसाला, तंबाखुची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे आढळले. महाराष्ट्रात या मालाला प्रतिबंध असून सोनगड (गुजरात) येथून काळ्या बाजारात विक्रीसाठी तो राज्यात विविध ठिकाणी नेण्यात येत असल्याचे आढळले. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता.5) सायंकाळी कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी वाहनासह माल जप्त केला, चालक बनेसिंग बाबुलाल कटारिया (रा.वडगाव, जि.आगरमालवा, मध्यप्रदेश), इसरार अहमद मुश्ताक अहमद (रा.इंदुर, मध्यप्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले. 1 लाख 20 हजारांचा गुटख्यासह मिनीट्रक असा मुद्देमाल जप्त केला. गुटखा मालाचे काही नमूने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे देण्यात आला. तपासणीअंती शहर पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील तपास करीत आहेत.

You May Also Like