CoronaVirus : IMAनं सुरू केली कोविड हेल्पलाइन, 24 तास मिळणार मदत

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपसून देशातील करोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता इंडियन मेडिकल असोसिएशनने  चांगला पुढाकार घेतला आहे. देशभरात पसरलेल्या डॉक्टरांच्या या संघटनेने कोविड हेल्पलाइन  सुरू केली आहे. या माध्यमातून रूग्णांना 24 तास मदत पुरविली जाईल. विशेष गोष्ट अशी आहे, की ही हेल्पलाइन चालवणारा सुमारे 250 डॉक्टरांचा स्टाफ करोनासंबंधी सर्व प्रकारची मदत पुरवेल.

तसेच, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे ए जयलाल यांनी सांगितलं, की आयएमएनं 95975757454 या नंबरवरुन हेल्पलाइन जारी केली आहे. देशभरातील लोक या नंबरवर कॉल करून करोनासंबंधीची (Covid Pandemic) सर्व माहिती घेऊ शकतात. या हेल्पलाइनमध्ये अशी व्यवस्था केली गेली आहे, जेणेकरुन लोकांना प्रत्येक स्थितीमध्ये मदत करणं शक्य होईल.मदत पुरविली जाईल. विशेष गोष्ट अशी आहे, की ही हेल्पलाइन चालवणारा सुमारे 250 डॉक्टरांचा स्टाफ कोरोनासंबंधी सर्व प्रकारची मदत पुरवेल.

त्याचप्रमणे या हेल्पलाइनच्या माध्यमातून रुग्णालयांमधील कोरोना बेडपासून व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची (ICU Beds) सुविधा, सेल्फ किंवा होम क्वारंटाईनच्या (Home Quarantine) वेळी घ्यावयाची काळजी, कोरोना झाल्यास घरीच करायचे उपाय, लसीबद्दलची जागरुकता, छोट्या घरांमध्ये रुग्ण आणि कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी, अशाप्रकारच्या लोकांच्या अनेक शंकांचं निराकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

You May Also Like