नारायण राणेंना बांधल्या डुक्करांच्या प्रतिमा

जळगाव : भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्थरांचे अपशब्द वापरत अवमान केला. त्याचे पडसाद उमटत असून जळगाव महानगर शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात डुक्‍करांना प्रतिमा बांधून निषेध करण्यात आला. तसेच शिवसैनिकांकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

राज्यामध्ये सर्वत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात निषेध नोंदवला जात आहे. वेगवेगळ्या घोषणाबाजी नारायण राणेंच्या विरोधात केले जाताहेत. नारायण राणे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी सुद्धा राज्यांमधील शिवसैनिक आक्रमक होऊन नारायण राणे यांच्या विरोधामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी गुन्‍हा दाखल करण्यात आले असून जळगावात देखील याची गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

You May Also Like