CoronaVirus : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा महत्त्वपूर्ण निर्णय, नाशिकलाही मिळणार दिलासा

नाशिक : देशात करोनाने गंभीर स्वरूप धारण केलेय,हि स्थिती आवाक्या बाहेरची झाली आहे.रुग्णांना बेड, ऑक्सिजन चा तुटवडा निर्माण होत या. या कारणस्तव अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दर दिवशी हजारोंच्या घरात मृत्यू असा करोनाचा तांडव सुरु आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर अशा परीस्थितीत काहीशी सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहयांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

देशातील फक्त आर्मी राखीव हॉस्पिटलमध्ये विशेष कोविड वॉर्ड निर्मिती करण्यात येणार आहे. यात सर्वसामान्य नागरिकांवरही उपचार होतील. लखनौ, पटना, अहमदाबाद, नाशिक यासह देशातील काही शहरात हे हॉस्पिटल्स आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने कोविड आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आर्मीकडून मदतीचा हात मिळणार आहे. याबाबत राजनाथ सिंह यांनी डिफेन्स सेक्रेटरीला आदेश दिले आहेत.

दरम्यान, DRDO आणी HAL यांच्या कॅम्पसमध्ये ही कोविड हॉस्पिटल्स उभारणीचं काम जलदगतीने सुरू झालं आहे. देशातील आर्मीच्या 63 हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत दिल्या जाणाऱ्या DRDO फॅसिलिटी आधारावर 63 हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्डची उभारणी केली जाणार आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like