क्रिकेटमध्ये एका संघात 11 खेळाडू त्यातील 10 जणांनी जर शतकं ठोकली

किंग्स्टन : बातमीचं शीर्षक वाचून तुम्ही विचार करत असाल, क्रिकेटमध्ये एका संघात 11 खेळाडू त्यातील 10 जणांनी जर शतकं ठोकली. तरी हजारच्या पार धावसंख्या जाईल. पण तुम्ही हा विचार करण्याआधीच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही चर्चा ज्या मॅचची सुरु आहे ती एक कसोटी मॅच असून यामध्ये 5 शतकं फलंदाजानी ठोकली होती. तर 5 गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये प्रत्येकाला 100 हून अधिक धावा चोपण्यात आल्याने या संपूर्ण सामन्यात 10 शतकांची नोंद झाली. आता हे सर्व आज सांगण्याच कारण म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 15 जूनरोजी हा सामना टेस्ट क्रिकेटचे
दिग्गज ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघात पार पडला होता.

ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्‍ट इंडीज यांच्यात 11 ते 17 जून 1955 रोजी किंग्‍स्टनच्या मैदानात हा कसोटी सामना खेळवला गेला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करत वेस्‍ट इंडीजने 357 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यात क्‍लाइड वॉलकॉटने 155, एवर्टन वीक्‍सने 56 आणि फ्रँक वॉरेलने 61 धावा लगावल्या. ऑस्‍ट्रेलियाच्या कीथ मिलर यांनी 6 विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या संघाला रोखलं. त्यानंतर ऑस्‍ट्रेलियाचा डाव सुरु झाला आणि 15 जूनपर्यंत ऑस्‍ट्रेलियाने 8 विकेट्सच्या बदल्यात तब्बल 758 धावांचा डोंगर रचला. हा स्कोर आजही ऑस्‍ट्रेलियाचा टेस्‍ट क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोर आहे.

7 धावांवर दोन विकेटनंतर लागली 5 शतकं

सामन्यात ऑस्‍ट्रेलियाने एक मोठी धावसंख्या उभी केली असली तरी संघाची सुरुवात मात्र खराब झाली होती. अवघ्या 7 धावांवर दोन विकेट्स पडल्या असताना कोलिन मॅक्‍डोनाल्‍ड यांनी 127 धावा करत पहिलं शतक ठोकलं. त्यानंतर जणू शतकांची रांगच लागली. चौथ्या नंबरचा फलंदाज नील हार्वे यांनी 204 धावा करत दुहेरी शतक ठोकलं. नीलनंतर लागोपाठ तिघा फलंदाजानी शतक लगावलं.

You May Also Like