जळगावात शेतक-यांच्या सन्मानात”बहुजन मुक्ती पार्टी तर्फे “बोंबाबोंब”आंदोलन करण्यात आले

जळगाव : बहुजन मुक्ती पार्टी च्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात म.जिल्हाधिकारी कार्यालया समोर व ३५८ तालुक्यात म.तहसिलदार यांच्या कार्यालयासमोर “शेतकरी समस्यांविषयी”… बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. जळगाव शहर व तालुका बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने लॉकडाऊनचे सर्व नियम पाळुन मा.अमजदभाई रंगरेज यांच्या नेतृत्वाखाली “बोंबाबोंब”आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विजय भाऊ सुरवाडे (जळगाव जिल्हा महासचिव बहुजन मुक्ती पार्टी),मा.खुशाल सोनवणे(शहर सचिव बहुजन मुक्ती पार्टी),मा.रियाज पटेल(शहर उपाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी),मा.सुकलाल पेंढारकर व मा.रहीमभाई तांबोळी,(उपाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी)यांनी शेतक-यांच्या शेतातील भाजीपाला जिल्हाधिकारी कार्यालया समोर विकला,व विकला न गेलेला भाजीपाला, फळभाज्या फेकुन देण्यात आल्या.मा.सुलतानभाई शेख, इरफान भाई शेख (जळगाव शहर अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी),देवानंद निकम,व सुभाष भाऊ सोनवणे यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
का केले बहुजन मुक्ती पार्टीने आंदोलन
गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचा कहर व त्यात घोषित केलेले अनाकलनीय लॉकडाऊन आणि हुकुमशाही सदृश्य लाकडाऊनचे निर्बंध यामुळे महाराष्ट्रातील नाही तर देशातील शेतकरी पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.या अन्नदात्याचे अर्थकारण पार कोलमडले आहे.राज्य सरकार व केंद्र सरकारच्या उदासिन व ढिसाळ धोरणामुळे अगोदरच कर्जबाजारी व समस्याग्रस्त असलेल्या समस्या उग्र झालेल्या आहेत.
काय आहेत बहुजन मुक्ती पार्टीच्या मागण्या

१)खते,बि बियाणे जुन्या दरा पेक्षाही ५०%कमी दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत.
२)नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगडित आवश्यक वस्तुंच्या दुकानांची योग्य व्यवस्थापन करून दिवसभर सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी.
३)बोगस बी बियाणे व भेसळयुक्त रासायनिक खते विक्री किंवा कृत्रिम तुटवटा निर्माण करुन चढ्या दराने खते,बी बियाणे विक्री करणा-या व्यापा-यांवर कार्यवाहीचे आदेश देऊन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत.
४)तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश संबंधित बॅंकांना देण्यात यावेत.
५)केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत. बहुजन मुक्ती पार्टीचा सरकारला अंतिम इशारा
या मागण्या सरकारने मान्य न केल्यास बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र सर उग्र आंदोलन करेल याची शासन व प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.

You May Also Like