दिलासादायक; मुंबईत चोवीस तासांत करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

मुंबई : राज्यात आणि देशात करोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. दिवस गणिक वाढणारी हि रुग्ण संख्या चिंतादायक बनत चालली आहे.गेल्या चोवीस तासांत देशात ३ लाखांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. असं असलं तरी मुंबईतून आता थोडी दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसून आलं आहे.

तसच, गुरुवारीदेखील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या चोवीस तासांत मुंबईत तब्बल ९५४१ जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ७२२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ९५४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ५ लाख २० हजार ६८४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

दरम्यान, मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या ८१ हजार ५३८ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली.

 

You May Also Like