उत्तर प्रदेशमधील : पत्नी सेक्सला नकार देत असते या नराधम पतीने त्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना

उत्तर प्रदेशमधील : पत्नी सेक्सला सतत नकार देत असते या रागात एका नराधम पतीने त्याच्या पत्नीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बसेडी गावात घडली आहे. तो नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या तीन चिमुरड्यांनाही नाल्यात फेकून देत त्यांची हत्या केली.

पप्पू कुमार असे त्या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पप्पू कुमारचे सहा वर्षांपूर्वी डॉली नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. त्याला सोनिया (5), वंश (3) आणि हर्षिता (1) अशी तीन मुलं होती.

मंगळवारी पप्पू कुमार घरी आला तेव्हा त्याने पत्नीकडे शारीरिक संबंध ठेवायची मागणी केली. मात्र डॉलीने त्याला नकार दिला. त्यावरून त्यांच्यात वाद झाले. संतापलेल्या पप्पूने रागाच्या भरात त्याच्याकडील गावठी बंदूकीने डॉलीवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात डॉलीचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर तो त्याच्या तिन्ही मुलांना घेऊन नाल्या जवळ गेला त्याने तिन्ही मुलांना नाल्यात फेकले. त्याला मुलांना नाल्यात फेकताना एका गावकऱ्याने पाहिले. त्याने आरडाओरड करून गावकऱ्यांना बोलावले. मात्र तोपर्यंत पप्पू तेथून फरार झाला होता. गावकरी डॉलीला कळवायला तिच्या घरी गेले असता तिथे डॉलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. गावकऱ्यांनी याबाबत पुरकाझी पोलीस ठाण्यात कळवले. पोलिसांनी काही वेळातच पप्पूला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.

You May Also Like