जीन्सी येथे बैलगाडीवर वीज कोसळल्याने बैलगाडीत बसलेल्या १० जण जखमी रावेर तालुक्यातील घटना

रावेर तालुक्यातील जीन्सी येथे बैलगाडीवर वीज कोसळल्याने बैलगाडीत बसलेल्या १० जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज जिल्ह्यासह तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने रावेर तालुक्यातील जिनसी या गावाजवळ बैलगाडीवरून जाणाऱ्या बळीरामपवार (वय-२१), दिलीप पवार (वय-२१), अरविंद पवार (वय-१५), ईश्वर दल्लू पवार (वय-१५), कमलसिंग लक्ष्मण पवार (वय-२०), अनिल लक्ष्मण पवार (वय-२७), बिंदुबाईल लक्ष्मण पवार (वय-५०), साईराम मोरसिंग पवार (वय-३७), मलखान मोरसिंग पवार (वय-४५) आणि लक्ष्मण मोरसिंग पवार (वय-५५) रा. जिन्सी ता. रावेर हे हे एकाच कुटुंबातील व्यक्तींचा यात समावेश आहे. १० जणांवर वीज कोसळून एकाच कुटुंबातील १० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे दरम्यान जखमींना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपुस केली. १० जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन यांनी माहिती दिली.

You May Also Like