नगर पालिकेच्या हद्दीतील भर रस्त्यावरील नाल्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांची गैरसोय

भुसावल येथील नगर पालिकेच्या हद्दीतील भर रस्त्याच्या रहदारीच्या ठिकाणी असलेला सांडपाण्याचा नाला गेल्या 3 महिन्या पासून दुरुस्तीच्या आशेवर शेण खात पडलेला आहे. भुसावळ नगरपालिकेचे मुखकार्यकारी अधिकारी यांनी स्थानिक नगर सेवक यांना काम दिलेले असून अद्यापही या नाल्याचे काम पूर्ण झालेले नाही. नाल्यावरून त्या विभागात असलेले दवाखाने मेडिकलचा रस्ता असून पूर्ण रहदारी थांबली आहे. यातच आता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने रुग्णांना कोणत्या मार्गाने दवाखान्यात न्यायचे असा प्रश्न उदभवू लागला आहे. याचबरोबर या रस्त्यावर सर्व मोठे मोठे दवाखाने व मेडिकल असून या नाल्यामुळे मात्र नागरिकांना तेथे जाण्यासाठी खूप अडचण निर्माण झाली आहे. सदरील नाल्याचे बांधकामाकडे नगर पालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे बुद्धिपुरस्कर दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे सदरील काम हे लवकर पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे दिनेश भाऊ ईखारे यांनी दिला आहे.

You May Also Like