राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; एसआयटी करणार तपासणी

मुंबई ।  उद्योजक राज कुंद्रा चांगलाच अडचणीत आला आहे.  दिवसेंदिवस त्याच्या अडचणीत वाढ होतं चालली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केल्यापासून राज कुंद्राबाबत अनेक खुलासे होतं आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक गंभीर वळण लागलं आहे.  हे प्रकरण सध्या खूपच गंभीर बनलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचने एसआयटीची टीम बनवली आहे.

 

 

पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्रासोबत तब्बल 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी समोर येत राज कुंद्रावर धक्कादायक आरोप केले असल्याची माहिती पुढे आली आहे.

You May Also Like