संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांच्या हाती कॉल रेकॉर्डिंग

पुणे ।  पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे.  पूजाच्या मोबाईलमधून पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याची माहिती समोर येत आहे.   यात पूजा आणि माजी मंत्री संजय राठोड यांचं संभाषण आहे.
आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. हे कॉल पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या पाच-सहा दिवसांपूर्वीचे असल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे.  धक्कादायक म्हणजे त्यातील एक संभाषण जवळपास 90 मिनिटाचं असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.
मंत्री राठोड यांनी दिलाय राजीनामा 7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणनं पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला.

You May Also Like