रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ; आयएमएने दाखल केली तक्रार

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी रामदेव बाबा यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केलीयं. तक्रार दिल्लीतील आयपी इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलीयं. तक्रारीत सांगितले कि, रामदेव करोनावरील उपचारांबद्दल संभ्रम पसरवित आहे, हा एक गुन्हा आहे. असे तक्रारीत म्हटलंय.

इंडियन मेडिकल असोसिएशन आणि योग गुरू बाबा रामदेव यांच्यातील वाद वाढतच आहेत. बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला होता. याबाबत पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीण्यात आलं असून अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केलांय. बाबा रामदेव यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देशभरातुन होत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने बाबा रामदेव यांना 1000 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली आहे.

पंतप्रधान मोदी एका बाजूला नागरिकांना करोना विरोधीत लस घेण्याचं आवाहन करत आहेत. तर दुसर्‍या बाजूला मपतंजलिफचे योगगुरू बाबा रामदेव करोना लसीचे दोन डोस घेऊनही देशात 10 हजार डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याचं सांगत फिरत आहेत. इतकंच नव्हे, तर अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांमुळे देशात करोना रुग्णांनी जीव गमावला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

You May Also Like