हॉकी स्पर्धेत भारताकडून न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव

टोकयो | ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकण्याच्या उद्देशानं स्पर्धेत उतरलेल्या भारतीय पुरुषांच्या हॉकी संघाने सुरुवात विजयानं केली आहे. शेवटपर्यंत रंगलेल्या लढताीमध्ये भारतानं न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला.

या दरम्यान, न्यूझीलंडच्या केन रसेलनं 6 व्या मिनिटालाच गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडची ही आघाडी फार टिकली नाही. भारताच्या रुपिंदर पाल सिंहनं 10 मिनिटालाच गोल करत बरोबरी केली. त्यानंतर हरमनप्रीत सिंहनं 26 व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर भारतीय टीमनं जोरदार खेळ केला. त्यानंतर सात मिनिटांनीच हरमनप्रीतनं दुसरा गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. तर शेवटपर्यंत रंगलेल्या लढताीमध्ये भारतानं न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला.

You May Also Like