भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4-3 ने मिळवला विजय

 टोकियो ।  भारतीय महिला हॉकी संघाने पूल स्टेजच्या आपल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव केला. यामुळे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या संघाच्या आशा कायम आहेत. उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या संघांचा निर्णय आयर्लंड आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील पूल अ सामन्याने होईल. वंदना कटारियाने भारतासाठी 3 गोल केले. वंदना ऑलिम्पिक सामन्यात गोलची हॅटट्रिक करणारी भारताची पहिली महिला हॉकी खेळाडू ठरली.

 

टोकियो ऑलिम्पिकच्या 9 व्या दिवशी डिस्कस थ्रो प्रकारातून भारतासाठी चांगली बातमी आली. येथे कमलप्रीत कौर 64 मीटर थ्रो करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. पात्रता फेरीत, कमलजीतसह फक्त दोन महिला खेळाडू 64 मीटरला स्पर्श करू शकल्या. अंतिम सामना 2 ऑगस्टला होईल.

You May Also Like