भारताला तिसऱ्या मेडलची अपेक्षा!

टोकयो ।  वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूनं सिल्व्हर तर बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनं बॅडमिंटनमध्ये ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे.  या दोन मेडलनंतर भारताला अजून एक मेडल मिळण्याची शक्यता आहे. भारताला तिसऱ्या मेडलची अपेक्षा कमलप्रीत कौरकडून आहे.

 

 

 

कमलप्रीतनं थाळी फेक स्पर्धेतील पात्रता फेरीत जोरदार कामगिरी करत सर्व देशाची अपेक्षा वाढवली आहे. पात्रता फेरीतील 31 खेळाडूंपैकी फक्त दोन खेळाडूंना फायनलमध्ये थेट प्रवेश मिळाला. यामध्ये कमलप्रीत आहे. कमलप्रीतनं तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटर लांब थाळी फेकत फायनलमध्ये प्रवेश केला होता. कमलप्रीतनं भारतामधील स्पर्धेत 66.59 मीटर लांब थ्रो केला होता. या प्रदर्शनाची पुनरावृत्ती तिनं टोकयो ऑलिम्पिकमधील फायनलमध्ये केली तर ती गोल्ड मेडल नक्की जिंकेल, असा विश्वास पूनिया यांनी केला आहे.

You May Also Like

error: Content is protected !!