भारताचं नाव युएसए करतील… ऑलिम्पिक पदक विजेत्याने लगावला टोला

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा प्रकारातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांच्याऐवजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा काही जणांनी स्वागत केले तर काहीनीं भाजपा सरकारला टोला लगावला आहे. काँग्रेसने देखील मोदीसरकारवर टीका केली आहे. दरम्यान, या वादात ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगने उडी घेतली आहे. विजेंदर सिंगने नाव न घेता मोदी सरकारला टोला लगावला.

 

 

“भाई, हे फक्त नाव बदलू शकतात, काही दिवसात भारताचे नाव देखील बदलून यूएसए करतील”, असा टोला विजेंदर सिंगने ट्विट करत लगावला आहे. विजेंदर सिंग याचे ट्विट खूप चर्चेत असतात. यापूर्वी देखील त्याने ऑलिम्पिक कव्हर करण्याबाबत भारतीय प्रसारमाध्यमांवर जोरदार निशाणा साधला होता.

You May Also Like

error: Content is protected !!