जम्मू काश्मीर येथे भारतीय जवानाला वीरमरण

जम्मू काश्मीर | दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमे दरम्यान भारतीय सैन्यदलातील जवान कृष्ण वैद्य यांना वीरमरण आले आहे. शुक्रवारी जम्मू काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर येथे सुरू असलेल्या ऑपरेशन दरम्यान जवान कृष्ण वैद्य यांना वीरमरण आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर, बालाकोट सेक्टर आणि मनकोट सेक्टर परिसरात दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैन्य दलाकडून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

You May Also Like