भारताच्या खात्यात आठवे पदक, सिंहराज अधानाने जिंकले कांस्य

टोकियो । टोकियो पॅरालिम्पिक खेळांचा आज सातवा दिवस आहे. आदल्या दिवशी भारताने 2 सुवर्णांसह 5 पदके जिंकली होती आणि आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. 39 वर्षीय सिंहराज अधाना यांनी 10 मीटर एअर पिस्तूल SH1 च्या अंतिम फेरीत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. अधाना 216.8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिले. चीनचा यांग चाओ 237.9 गुणांसह सुवर्ण जिंकण्यात यशस्वी झाला, तर चीनच्या हे हाँग जिंगला रौप्य पदक मिळाले.

 

 

खरेतर मनीषने एलिमिनेशन फेरीत सर्वांची निराशा केली आणि 135.8 गुणांसह बाहेर पडला. 18 वर्षीय मनीष नरवाल क्वालिफिकेशनमध्ये अव्वल ठरला होता पण अंतिम फेरीत संथ सुरुवात करून तो 7 व्या स्थानावरुन वर येऊ शकला नाहीत. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकांची संख्या आता 8 झाली आहे. ज्यात 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य समाविष्ट आहेत.

You May Also Like