भारताने केलेली मदत विसरता येणार नाही; अमेरिकेनं व्यक्त केली कृतज्ञता

नवी दिल्ली : करोना काळात भारताची साथ दिल्यामुळे जो बिडेन प्रशासनाचे आभार मानले. 20 जानेवारी रोजी बिडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेच्या अधिकृत दौर्यावर असलेले जयशंकर हे देशाचे पहिले कॅबिनेट मंत्री आहेत. आम्ही खात्री देतो की, या कठीण काळात आम्ही भारतासोबत उभे आहोत, असे अँटनी ब्लिंकेन म्हणाले. करोनाच्या सुरवातीच्या काळात भारताने अमेरिकेला केलेली मदत अमेरीका नेहमी स्मरणात ठेवील.

जयशंकर म्हणाले की, आम्ही विविध मुद्द्यांवर चर्चा केली. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील संबंध खूप मजबूत आहेत आणि मला विश्वास आहे की भविष्यातही असेच राहतील. कठीण काळात भारताची मदत केल्यामुळे जो बिडेन प्रशासन आणि अमेरिकेचे आभार मानतो असं त्यांनी सांगितलं. तसंच भारत आणि अमेरिका करोनाकाळात सोबत काम करत आहे. या दरम्यान अनेक आवाहनांचा सामना आम्ही एकत्र करत असल्याचे ब्लिंकेन म्हणाले. तसेच याव्यतिरिक्त, एस जयशंकर यांनी इंडो-पॅसिफिक आणि भारत आणि अमेरिकेमधील आरोग्य, डिजिटल अशा विविध क्षेत्रांमधील भागीदारीशी संबंधित मुद्द्यांविषयी चर्चा केली.

करोना साथीच्या आजारांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर विस्तृत चर्चा केली. बैठकीत जयशंकर यांनी जागतिक स्तरावर त्वरित व प्रभावी ‘जागतिक लस’ उपाय शोधण्याची मोठी गरज असल्याचे अधोरेखित केली. यावर्षी जानेवारीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्य म्हणून भारत सामील झाल्यानंतर जयशंकर यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांशी पहिलीचं बैठक होती. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस यांची भेट घेतली.

You May Also Like