”भारताची आबादी वाढतेय, तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा”

मुंबई : बॉलिवूडची ‘क्वीन’कंगना रनौत दर वेळी तिचा विविध वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. यावरून अनेकदा वाद विवादही होत असतात. तसेच, प्रत्येक विषयावर तिची प्रतिक्रिया देत असते. बर्‍याच वेळा ती असे काही बोलते, ज्यानंतर तिला खूप ट्रोलही केले जाते.

आता पुन्हा एकदा कंगना तिच्या एका ट्विटने चर्चेत आली आहे. भारतातील वाढती लोकसंख्या या विषयावर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे देशात लोक मरत आहेत, असे कंगना म्हणाली. अभिनेत्रीने ट्विट केले की, ‘देशात लोकसंख्या सतत वाढत असल्याने लोक मरत आहेत. म्हणून तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना दंड ठोठावावा आणि त्यांना तुरूंगवासाची शिक्षा द्यावी.’

कंगनाने लिहिले की, ‘हे खरे आहे की इंदिरा गांधी निवडणूक हरली आणि नंतर त्यांनाही मारण्यात आले, कारण त्यांना या विषयावर कारवाई करायची होती.’

सध्या कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले आहेत.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like