हिंदुस्थानचा महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर

हिंदुस्थानचा महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानी संघाची फलंदाज शेफाली वर्मा हिने चमकदार कामगिरी केली. इंग्लंडने पहिल्या डावात उभारलेल्या 396 धावा केल्या होत्या. हिंदुस्थानी संघाने पहिल्या डावाची सुरुवात अत्यंत दमदार पद्धतीने केली. मात्र मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्याने हिंदुस्थानने दुसऱ्या दिवस अखेर 5 बाद 187 धावा केल्या. हिंदुस्थानचा महिला संघ अद्यापही 209 धावांनी पिछाडीवर आहे.

शेफालीचे शतक हुकले

स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी हिंदुस्थानला दमदार सलामी दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर हिंदुस्थानचा डाव कोसळला आणि अवघ्या 20 धावांमध्ये 5 गडी गमावले.

तब्बल 7 वर्षानंतर कसोटी सामना खेळण्यासाठी उतरलेल्या हिंदुस्थानच्या महिला संघाकडून शेफाली वर्मा हिने पदार्पण केले. अफलातून क्षेत्ररक्षण करत नेत्रदीपक झेल टीपणाऱ्या शेफालीने फलंदाजीतही आपली कमाल दाखवली. शेफाली पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकवण्याची संधी होती, मात्र शतकाला 4 धावा कमी असताना क्रॉसच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारताना ती बाद झाली आणि तिचे शतक हुकले. शेफाली बाद झाल्यानंतर स्मृती मंधाना देखील 78 धावांवर बाद झाली. या दोघींनी मिळून

37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी करत 1984 ला गार्गी बॅनर्जी व संध्या अग्रवाल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवलेला 153 धावांचा विक्रम मोडला. या दोघींनंतर फलंदाजीसाठी आलेली पूनम राऊत 2 धावांवर, शिखा पांडे शून्यावर आणि मिताली राज 2 धावांवर बाद झाली. हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या संध्या खेळपट्टीवर आहेत.

You May Also Like