कुख्यात गुन्हेगाराला पैशांचा माज आला अंगलट: सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या मांडीवर लहान मुलगा बसलेला आहे आणि त्याच्या आजुबाजूला 500 आणि 200 च्या नोटांचे बंडल पडले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इतके पैसे बघून लोक चकित झाले आहेत.

येथील डोंगरी परिसरात राहणारा एक गँगस्टर सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमुळे अडचणीत आला आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा लाखो रुपयांच्या नोटांसोबत खेळताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या गँगस्टरला समन बजावून पैंशाबाबत विचारणा केली आहे.  पोलिसांनी सांगितले की, हा व्हिडिओ कुख्यात गुन्हेगार ’शम्स सैयद’चा आहे.

मुंबई पोलिसमधील डीसीपी एन चैतन्य यांनी सांगितले की, ’या व्हिडिओबाबत आम्ही एक नोटिस जारी केला आहे. व्हिडिओत दिसणार्‍या व्यक्तीकडून त्या पैशांच्या सोर्सची विचारणा करण्यात आली आहे.’ त्यांनी पुढे सांगितेल की, गँगस्टर शम्स सैयदवर हत्येचा प्रयत्न करण्यासोबतच इतर दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

You May Also Like