”जखमी वाघिणी जिंकली! देशाने पश्चिमबंगालकडून शिकावे”, शिवसेनेचा निशाना

मुंबई : ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सलग तिसर्‍यांदा निवडणूक जिंकली असून निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे.पश्चिम बंगालच्या जनतेचेही अभिनंदन करावे तेवढे थोडेच. पश्चिम  बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही. आपल्या मातीतील माणसांच्या प्रतिष्ठेसाठी बंगाली जनता ठामपणे उभी राहिली. देशाने पश्चिम बंगालकडून शिकावे, असे मत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केले आहे.

पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. इतकेच नव्हे, तर मोदी- शहांनी उभे केलेले तुफान रोखत भाजपचा डाव शंभरच्या आत ‘ऑल आऊट’ करुन टाकला, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

देशात थैमान घालत असलेल्या महाभंयकर कोरोना महामारीस हरवायचे सोडून पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरविण्यासाठी उतरले होते.पश्चिम बंगाल जिंकता यावे म्हणून तेथे मतदानाच्या आठ फेऱ्या लादण्यात आल्या. पण झाले काय? असा सवाल शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला आणि करोना जिंकला. पाच राज्यांतील, विशेषतः पश्चिम. बंगालातील निवडणुकीच्या अनियंत्रित रेट्यामुळे देशात कोरोना वाढत गेला हे मद्रास हायकोर्टाचे निरीक्षण आहे. देशात ज्या वेगाने करोना वाढला व पडझड झाली त्यास मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगास जबाबदार धरले व ते योग्यच आहे. फक्त पश्चिम बंगाल जिंकायचेच, या एका ईर्षेने व द्वेषाने ‘मोदी- शहां’चा भाजप मैदानात उतरला. त्यांनी लाखोंच्या सभा, रोड शो करुन करोनाबाबतचे सर्व नियम पायदळी तुडवले व निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन करोना निवारणाच्या देवपूजेला लागले, पण वेळ हातची गेली आहे. इतके करूनही पश्चिम बंगालमध्ये जनतेने भाजपला साफ नाकारले आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like