शहरातल्या टिंबर मार्केटमधील अवैध बांधकामावरून मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना शिवीगाळ

भुसावळ : शहरातल्या टिंबर मार्केटमधील अवैध बांधकामावरून मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आ. संतोष चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी संतोष चौधरी यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर आज आ. चौधरी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी चिद्रवार यांनी टिंबर मार्केटमधील सर्व्हे नंबरमधील २०६ सर्वोदय छात्रालयाच्या जागेवरील सुरु असलेल्या बांधकामाची पाहाणी करण्यासाठी गेले होते. तेथे माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुख्याधिकारी यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चिद्रवार यांनी बाजारपेेठ पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली होती. या अनुषंगाने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष चौधरी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला तपास करीत आहे.

दरम्यान, संतोष चौधरी यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर शनिवारी कामकाज होऊन चौधरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना मंगळवारपर्यंत अटक करू नयेत असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तर त्यांच्या जामीनवर २२ रोजी सुनावणी होणार आहे.

You May Also Like

error: Content is protected !!