गेल्या काही वर्षांत फिक्स्ड डिपॉझिट आणि पेन्शन योजनांवरील व्याजदर कमी करण्यात आला

मुंबई : गेल्या काही वर्षांत फिक्स्ड डिपॉझिट आणि पेन्शन योजनांवरील व्याजदर कमी करण्यात आला आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यांचे नियमित उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे त्यांचे पेन्शन. अशा परिस्थितीत सरकार चालवत असलेली वय वंदना योजना ही त्यांच्यासाठी एक आकर्षक पर्याय असल्याचे समोर आलं आहे.

सध्या सर्व फिक्स्ड डिपॉझिट आणि निवृत्ती वेतन योजनांच्या तुलनेत पंतप्रधान वय वंदना योजनेत अधिक व्याज मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे या योजनेच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. सध्या या योजनेचा व्याजदर आठ टक्क्यांवरून घसरुन 7.4 टक्क्यांवर आला आहे. तर, वार्षिक निवृत्ती वेतनाची पर्याय निवड केल्यास 7.66 टक्के वार्षिक परतावा मिळेल.

निवृत्ती वेतनासाठी एकरकमी गुंतवणूक

वयोवृद्धांना निवृत्ती वेतनासाठी वय वंदना योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. दरवर्षी 1 एप्रिलला सरकारच्या या योजनेच्या परताव्याचा आढावा घेऊन फेरबदल करते. मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर निवृत्तीवेतन घेतले जाऊ शकते.

नव्या सुधारणांनंतर ग्राहकांना दर महिना 1000 च्या निवृत्तीवेतनासाठी किमान 1.62 लाख रुपये गुंतवावे लागतील. तर त्रैमासिक पेन्शनसाठी 1.61 लाख, सहा महिन्यांच्या पेन्शनसाठी 1.59 लाख आणि वार्षिक निवृत्तीवेतनासाठी किमान 1.56 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

पेन्शन किती मिळणार?

वय वंदना योजनेत जास्तीत जास्त मासिक पेन्शन 9250 रुपये मिळतात. तर त्रैमासिक पेन्शन 27,750 रुपये, 55,500 रुपये सहामाही पेन्शन आणि 1,11,000 रुपये जास्तीत जास्त वार्षिक पेन्शन मिळते. या योजनेत गुंतवणूकदार जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

जर आपण 2021 मध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 2031 पर्यंत तुम्हाला वार्षिक 7.4 टक्क्यांपर्यंत निश्चित उत्पन्न मिळेल. या पॉलिसीची मुदत दहा वर्षानंतरही जर गुंतवणूकदार टिकून राहिले तर त्याला पेन्शनच्या शेवटच्या हप्त्यासह गुंतविलेली रक्कम परत मिळेल. तर दुसरीकडे, जर पॉलिसीच्या मुदतीमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनीला गुंतवणूकीची संपूर्ण रक्कम मिळेल

You May Also Like

error: Content is protected !!