२२ मार्चपासून एकही कमर्शियल फ्लाईट भारतात येणार नाही – केंद्र सरकार

दिल्ली : देशात कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय कमर्शियल फ्लाईट्स २२ मार्चपासून बंद करण्यात येणार आहेत. एका आठवड्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करण्याचा केंद्राचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. १९) ८ वाजता देशाला संबोधित करणार आहे. यावेळी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स बंद करण्याची इच्छा व्यक्त केली होती. बाहेरून येणाऱ्या सर्व फ्लाईट्स बंद कराव्यात, अशी विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव हा बाहेरील देशातून आला आहे. बाहेरून आलेल्या लोकांमुळेच हा रोग महाराष्ट्र आणि देशात पसरला आहे, असंही ते म्हणाले. त्याचवेळी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे राजेश टोपे यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता यामध्ये आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात ४९ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढत जात आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ४९ रुग्णांमधून २ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर इतरांची प्रकृती स्थिर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा…

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.