“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”

नवी दिल्ली : सध्या देशात करोनाची स्थिती अतिशय गंभीर झाले. वाढत्या रुग्ण संख्येमुळे बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी रात्रीच पोलीस स्टेशन गाठलं आणि संताप व्यक्त केला.

पोलिसांनी यावेळी त्यांना फक्त चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं. दरम्यान काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी रेमडेसिवीर खरेदी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दिग्विजय सिंग यांनी ट्विट केलं असून हा अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं म्हटलं आहे.

दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत म्हटलं की, “खरं तर फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी केले याची चौकशी झाली पाहिजे. तसंच कोणाच्या परवानगीने केले याचीही चौकशी झाली पाहिजे. ही अत्यंत लाजिरवणी बाब आहे”.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6 

 

 

You May Also Like