शिवसेनेच्या शहर उपप्रमुखांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करा!

शिवसेनेतर्फे उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना निवेदन
शिरपुर : शिरपुर शहर शिवसेनेचे उपप्रमुख प्रविण लाङंगे यांच्यावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्याची सखोल चौकशी करावी अश्या आशयाचे निवेदन शिरपूर येथील पोलिस उपविभागिय अधिकारी यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.

शिरपूर शहरातील मच्छी बाजार येथे शिरपूर शहर शिवसेना उपप्रमुख बंटी लांडगे यांच्यावर काही अज्ञात इसमांनी धारधार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. ते अतिशय गंभीर अवस्थेत धुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा हल्लेखोरा विरूध्द कड्क कारवाई व्हावी. तसेच शहराला काळीमा फासणारी हि घटना घडलेली आहे. या मुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख धुळे भरतसिंग राजपूत, तालुका प्रमुख दीपक चोरमले, आत्तरसिग पावरा, राजू टेलर, देवेंद्र पाटील, अभय भदाने, मनोज धनगर, योगेश ठाकरे, मसूद शेख, रवींद्र जाधव, नितीन सोनार, जितेंद्र राठोड, मंगल भाई, अर्चना देसले, वीणा वैद्य, जितेंद्र पाटील, तुषार महाले, सुकलाल पावरा, सागर बारी, दिगंबर राठोड , दिनेश पाटील, आदी पदाधिकारी, शिवसैनिक व भरतसिंग नगर येथील रहिवासी उपस्थित होते.

You May Also Like