IPL 2021: करोनावर मात करून स्टार गोलंदाज अक्षर पटेल पुन्हा मैदानात

मुंबई: हैद्राबाद विरुद्ध दिल्ली सामना 25 एप्रिल रोजी चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान,हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यापूर्वी संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. स्टार गोलंदाज कोरोनावर मात करून पुन्हा टीममध्ये परतला आहे. आता 25 एप्रिल रोजी तो मैदानात उतरणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स संघातील स्टार गोलंदाज आणि सर्वांचा लाडका बापू पुन्हा टीमसोबत जोडला गेला आहे. करोनावर यशस्वीपणे मात करून मैदानात उतरण्यासाठी तो तयार झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याचा व्हिडीओ ट्वीट करत बापू रिटर्न्स असं कॅप्शन दिलं आहे.

अक्षर पटेलला नाडियाडचा ‘जयसूर्या’ असंही म्हटलं जातं. तर संघात त्याला प्रेमाने बापू म्हणतात. IPL सामना सुरू होण्याच्या एक दोन दिवस आधीच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पहिले काही सामने त्याला खेळता आलं नाही. मात्र करोनावर यशस्वीपणे मात करून तो पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान हैद्राबाद विरुद्ध दिल्ली सामना 25 एप्रिल रोजी चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का हे पाहाणं सर्वांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like