आयपीएल: 29 तारखेला बीसीसीआय करणार मोठी घोषणा?

मुंबई : बीसीसीआय सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान स्पर्धेच्या 14 व्या हंगामातील उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. आयपीएल 2021 मधील 29 सामने यापूर्वीच खेळविण्यात आले आहेत. ज्यानंतर खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आणि परिणामी कोरोनाच्या संक्रमणामुळे आयपीएलचं 14 वं पर्व अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावं लागलं.बीसीसीआयचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयपीएलचे सीओओ हेमंग अमीन यांनी आयपीएल 2021 मधील उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन करण्यासाठी 2 वेळापत्रक तयार केले आहेत.

आयपीएलचा 13 वा मोसम यूएईमध्ये यशस्वीपणे पार पडला होता. त्यामुळे युएईमध्येच आयपीएल 2021 चा 14 हंगाम आयोजित करावा, अशी मागणी होत होती. पण बीसीसीआयने धाडसाने भारतातील 6 शहरांत स्पर्धेचं नियोजन केलं. करोनाच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धी निम्म्यातच तहकूब करावी लागली. तर आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक प्रोयोरिटीने अमीन बीसीसीआय पुढे मांडण्यात येणार आहेत.

You May Also Like