”लशींबाबत केंद्राने हात आखडता घेणे अयोग्य”

जालना : सध्या देशांत करोनाने थैमान घातला असून, रुग्णांना आरोग्य सुविधा अभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत. प्रामुख्याने देशात ऑक्सीजन चा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्मान झालाय.

दरम्यान, केंद्राने महाराष्ट्रासाठी करोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा करताना हात आखडता घेणे योग्य नाही. ४५ वर्षे वयाच्या वरील सर्वांचे लसीकरण करावयाचे असेल तर राज्याला दररोज आठ लाख लशींची आवश्यकता आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.

जिल्हा नियोजन समिती आणि आमदार स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून जालना शहरातील अग्रसेन भवन येथे उभारण्यात आलेल्या ११० खाटांच्या करोना उपचार केंद्राचे उद््घाटन टोपे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना टोपे म्हणाले, राज्यात अधिक लशींची आवश्यकता आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like

error: Content is protected !!