”केंद्रावर खापर फोडणं अयोग्य, तुम्ही काय करताय ते सांगा” दरेकर यांचा सवाल

मुंबई : सध्या देशात कारोनाने थैमान घातलाय. परिस्थिती आता हाताबाहेर आहे. दरम्यान रुग्ण संख्या वाढ होत असल्याने रुग्णांना आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवतो आहे. दरम्यान,  राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपण केंद्राच्या पाया पडायला तयार असल्याचं म्हटलं आहे. केंद्राने मदत करण्याची मागणी राजेश टोपे यांनी केली असून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आलं आहे.

“राज्य सरकारचा केंद्र सरकारविरोधात खडे फोडल्याशिाय एकही दिवस जात नाही. राज्य सरकारने करोना काळात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी काय केलं याचा आकडा सर्वांसमोर आला पाहिजे. केंद्रानं दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन देण्याचं घोषित केलं असताना तो आणण्याची जबाबदारी कोणाची? त्यासाठी साधे ३२ टँकर उपलब्ध करु शकत नाही. वाहतुकीसाठी विशेष विमानांची व्यवस्था का केली जात नाही?,” अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

तसेच, १८ वर्षाच्या पुढील सर्वांच्या लसीकरणाला मोदींनी मान्यता दिल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु आहे. जास्त बोलण्यापेक्षा कृती जास्त करा असं आवाहनच यावेळी प्रवीण दरेकर यांनी केलं. राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. “राजेश टोपे ३६ हजार इंजेक्शनची आवश्यकता आहेत सांगताना नवाब मलिक आणि आव्हाड ५० तर संजय राऊत ८० हजार इंजेक्शनची गरज असल्याच सांगत आहेत,” असं प्रवीण दरेकर म्हणाले. आम्ही देत होतो तर ब्रुक फार्माच्या मालकाला आत टाकलं अशी टीका करताना तो साठा कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली. आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्राला टार्गेट करण्याचा नियोजनबद्द कार्यक्रम सुरु असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

“केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राला झुकतं माप दिलं आहे. पण सातत्याने केंद्रावर टीका करताना आपलं नियोजन काय ते राज्य सरकारने सांगावं. आपल्याला जमत नाही पण केंद्राकडे ढकलणं चूक आहे,” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like