जडेजाने शेयर केली भारतीय संघाची नवी जर्सी, 90 च्या दशकाशी आहे खास नातं

मुंबई : भारतीय संघाचा अष्टपैलु खेळाडु रविंद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठीची भारतीय संघाची नवी जर्सी चाहत्यांना दाखवली आहे. सोशल मीडियावर जडेजाने या जर्सीचा फोटो शेयर केला आहे. या जर्सीचा लूक 90 च्या दशकातल्या जर्सीसारखा आहे. या फोटोला जडेजाने कॅप्शनही तसंच दिलं आहे. 90 च्या दशकाची आठवण, मला ही जर्सी खूप आवडली, असं जडेजा कॅप्शनमधे सांगितलंय.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढच्या महिन्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय टीम 2 जूनला इंग्लंडला रवाना होईल. या मॅचसाठी निवड झालेले खेळाडू सध्या मुंबईत क्वारंटाईन झाले आहेत, यात जडेजाचाही समावेश आहे. जडेजाने आयपीएल 2021 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. बॅटसोबतच बॉलिंगमध्येही त्याचं प्रदर्शन चांगलं राहिलंय.

दरम्याण, आयपीएल 2021 रद्द होण्याआधी जडेजाने बँगलोरविरुद्धच्या सामन्यात 28 बॉलमध्ये 62 रनची धडाकेबाज खेळी केली होती. या मॅचमध्ये त्याने हर्षल पटेलच्या 6 बॉलमध्ये 5 सिक्स मारले होते, ज्यामुळे एका ओव्हरमध्ये तब्बल 37 रन आले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध पाच टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होईल, तर अखेरची टेस्ट 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

You May Also Like