आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र; आमदार मंगेश कुडाळकर गुवाहाटीला रवाना

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे आमदार मंगेश कुडाळकर हे देखील शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाले आहे. शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. आमदार मंगेश कुडाळकरांच्या जय महाराष्ट्र मुळे शिवसेनेला तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे.

आमदार मंगेश हे कुडाळकर सुरतमार्गे गुवाहाटीला जाणार असल्याचे समजले आहे. सकाळपर्यंत माझा विचार नव्हता, मात्र काही कारणाने जावं लागत असल्याचं मंगेश कुडाळकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. आमदार मंगेश कुडाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते, त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना परत येण्याचे आवाहन केल्यानंतर ही शिवसेनेचे 4 आमदार आज शिंदे गटात पोहोचले आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटात आता आणखी 4 आमदार दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like